Issue Description


Authors : विलास खुणे

Page Nos : 253-256

Description :
लोकनाट्यात पुष्कळदा पौराणिक ऐतिहासिक किंवा लोककथांवर आधारलेल्या विषयांवरील नाट्यय चालू असता या प्राचीन विषयांची समकालीन विषयांशी सांगड घालण्यात येते. लोकनाट्यातील सूत्रधार व विदुषक सदृश विनोदी पात्रांची ही एक विशेष लकब असते. विषय व वातावरण प्राचीन परंतु त्यात समकालीन राजकारण व समाजकारण यातील एखाद्या ठळक घटनेवर ही पात्रे सहजच विनोदपूर्ण टिकाटिप्पणी करुन जातात. अशा वेळी ती प्रेक्षकांकडे वळून त्यांच्याषी गप्पा मारल्यासारखे करतात. त्यायोगे नट व प्रेक्षक यामध्ये एक प्रकारचा सहज संवाद निर्माण होतो. भिन्न भिन्न काळात प्रचलीत असलेल्या सामाजिक घटनांची व प्रष्नांची अषा रीतीने प्राचीन विषयांशी सांगड सहजगत्या घातली जात असल्यामुळे कुटल्या काळात लोकनाट्यांचा ताजेपणा व आवाहन कायम राहतात तसेच लोकनाट्यातून केला जाणारा स्थूल का होईना पण नैतिकबोध ग्रामीण जनात लोकप्रिय होण्याला कारणीभूत ठरतो. सारांश, लोकनाट्य हा ग्रामीण जनांची नैतिक, भावनात्मक व रंजनात्मक अशा विविध प्रकारची भूक भागविणारा किंबहूना त्यांच्या समग्र आंतर व्यक्तीमत्वास व्यापून टाकणारा करमणूक प्रकार आहे. केवळ करमणूक प्रकारच नव्हे तर एक प्रकारचा संपूर्ण भावनिक अनुभव आहे. त्यायोगे त्याचे आकर्षण कमी होणारे नाही.

Date of Online: 30 Jan 2023