Issue Description


Authors : उषा खंडाळे

Page Nos : 249-252

Description :
आजच्या आधुनिक युगात भारतीय परंपरा वाढत्या आधुनिकीकरणाच्या काळात, इंटरनेटच्या युगात मागे पडायला लागल्या आहेत. प्राचीन भारतातील कुटूंब व्यवस्था व सामाजिक रचनेचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की या रचनेला धार्मिक, सामाजिक पाठबळ होते. प्राचीन धर्मग्रंथात तर या नात्याला वेगवेगळ्या ऋतूच्या व कवितेच्या, धार्मिक कथेच्या आधारावर पुढच्या पिढ्यानकरिता संग्रहीत केले आहे. ”पद्यपुराणाच्या सृष्टिखंड (47/11) मध्ये ़ऋचेच्या तत्वात असे सांगतले आहे की ”सर्वतीर्थमयी माता सर्वदेवमयः पिता । मातरं पितरं तस्मात सर्वदेवमयः पुजतेता ।।“ परंतु आजच्या आधुनिक काळात बालक पालक संबंध हे मुलांच्या शारिरीक, मानसिक, भावनिक व सामाजिक विकासाची गुरुकिल्ली असायला हवी परंतु आज ही गुरुकिल्ली हरवायला लागली आहे. बालक पालक संबंधाचा विकास करायला ही किल्ली जपायला हवी निकोप संबंधाचा आधार विकसित करायचा असेल तर त्याच्या पायÚयाची रचना निराकार असायला हवी ही निकोपता टिकविण्याकरिता नात्यात सुरक्षितता, विश्वास, आदर, स्विकृती, प्रेमभावना गुणवत्ता इ. असावी हे घटक टिकविण्यासाठी पालक बालक निकोप संबंध आधुनिक काळाची गरज म्हणून जन्माला यायला हवी करिता लघुसंशोधनाच्या माध्यमातुन सदर विषयावर चर्चा करुन समस्या व त्यावरील उपाययोजना सुचना करण्यात येतील.

Date of Online: 30 Jan 2023