Issue Description


Authors : सुप्रिया राजेंद्र सादलवार

Page Nos : 234-244

Description :
आज जाहिरात हा प्रकार आपल्या आर्थिक आणि सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेला आहे. दिवसाचे चैवीस तास आणि वर्शाचे तीनषे पासश्ट दिवस विविध माध्यमाद्वारे ग्राहकांवर जाहिरातीचा सातत्याने भडिमार होत असतो. जाहिरातीतून माहिती आणि ज्ञानप्रसारणाचे काम उत्तम रीतीचे होत असल्याने आधुनिक काळात जाहिरातीला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. व्यापार आणि उद्योग जगतात जाहिरातीचा वापर मोठया प्रमाणात होतो. अर्थात वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनात जाहिरात हि अपरिहार्य बाब बनून राहीली आहे. भारतीय संस्कृतीत चैदा विद्या आणि चैसश्ट कला याचा अभ्यास करण्याची प्राचीन परंपर आहे. चित्रकला, नृत्यकला, संगीत, अभिनय, लेखन यासारख्या कलाचा आविश्कार अभिव्यक्ती ही मानवी संस्कृतीची रचनात्मक आणि सृजनात्मक बाजु गेल्या काही षतकांमध्ये विकसित झालेली. आधुनिक संस्कृती ही एक नव्या कलप्रकारात रूजु झाली. श्रीपाद कृश्ण कोल्हटकरांनी जाहिरातीला ‘पासश्टावी कला’ असे संबोधले आहे. कोश्टकरांच्या या उपरोक्त निवेदनात मोठी सत्यता आहे. कोणत्याही व्यावसायिक, उद्योग किंवा व्यवस्थापन आपल्या उत्पादनाची, सेवेची विक्री करण्यासाठी मोठया कल्पकतेने आणि योजकतेने जाहिरातीचा आधार घेत असते. ती कलात्मक रितीने सादर केल्याने ग्राहकांच्या गळी उतरत असते. ‘जाहिरात म्हणजे ग्राहकांपर्यंत वस्तू, उत्पादन, सेवांबदलची माहिती किंवा संदेष पोहोचविणे.’ मुद्रित माध्यमातील जाहिराती पंधराव्या षतकापासून सुरू झाल्याच्या नोंदी आहेत. तत्पूर्वी भारतात आणि पुर्ण जगातच विक्रेता आणि उपभोक्ता यांच्यामधील सुसंवादाचा दुवा दवंडीवाले होतेच. दवंडीच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेष पोचत असत. फेरीवाले ओरडून आपल्या मालसंदर्भात लोकांना सांगत असत. हा जाहिरातीचा प्रकार आजही आपल्याकडे चालू आहे. गुटेनबर्ग च्या मुद्रण कलेच्या षोधामुळे माहितीच्या प्रसारणाचे नवे माध्यम उपलब्ध झाले आणि पहिली ज्ञात इंग्रजीतील छापील जाहिरात विल्यम कॅक्स्टनने इ.स 1577 मध्ये हॅण्डबिलच्या स्वरूपात केली, मुद्रणकला स्थिरावली आणि 1652 साली काॅफी विशयक जाहिरात त्यावेळी प्रकाषित होणाÚया साप्ताहिकात प्रसिध्द झाली. त्यानंतर इ.स. 1657 मध्ये चाॅकलेट आणि 1658 मध्ये चहाच्या पहिल्या जाहिराती प्रसिध्द झाल्या. इ.स 1705 मध्ये आधुनिक स्वरूपाचे पहिले वर्तमानपत्र इंग्लंडमध्ये प्रकाषित झाले. अठराव्या षतकात हॅण्डबिल हे जाहिरातीचे लोकप्रिय आणि प्रभावी मध्यम म्हणून प्रचालित झाले. अमेरिकेत प्रसिध्द होणाÚया बोस्टन न्यूजलेटर या पहिल्यावहिल्या अमेरिकन साप्ताहिकात घरे व इतर वस्तूची खरेदी विक्री आणि भाडेत्त्वावर देण्याच्या जाहिराती लक्षणीय संख्येने प्रसारित होऊ लागल्या. भारतातही मुद्रित माध्यमातील पहिली जाहिरात 29 जानेवारी 1780 या दिवषी बेंगाल गॅझेट या पहिल्या वृत्तपत्रात प्रसारित झाल्याची नोंद आहे. तेव्हापासुन भारतात आजपर्यंत जाहिरातीची क्षेेत्रे मोठया प्रमाणात विस्तारल्याचे आपण पाहतो. व्यापार उद्योग आणि सेवाविशयक व्यवस्थापनानी जाहीरातीचा विविध संवादमाध्यमातून ग्राहकांवर एवढा मारा केला आहे. की आज जाहिरातीचा अतिरेक होतो आहे. असे म्हटले तर वावमे होणार नाही. तरीपण व्यावसायिकांच्या दृश्टिने जाहिरात ही एक व्यावसायिकदृश्टया मूलभूत गरज बनली आहे. त्यामुळे व्यावसायिक आपल्या वस्तुची मागणीसाठी व व्यवसाय वाढीसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतात.

Date of Online: 30 Jan 2023