Issue Description


Authors : राजेश प्रल्हाद कांबळे

Page Nos : 224-229

Description :
औद्योगिकदृष्ट्या भारताचा भूतकाळ गौरवपूर्ण होता. जगातील इतर देश ज्या काळात संस्कृतीच्या प्रारंभिक अवस्थेत होते त्या काळात औद्योगिकदृष्ट्या भारत प्रगतीच्या शिखरावर पोहचलेला होता. ढाक्याची मलमल, मुराबादाची भांडी, काश्मीरचे गालीचे अशा अनेक कलात्मक वस्तूच्या निर्मीतीसाठी त्या वेळी भारताला जागतिक प्रसिध्दी मिळाली होती. परंतु 18 व्या शतकात ब्रिटीशांचे भारतात आगमन झाले. व त्यांच्या कुटील राजनीतीमुळे हळूहळू लघु व कुटीर हे व्यवसाय नष्ट होऊ लागले. स्वातंत्रप्राप्तीनंतर सरकारने मात्र लघु व कुटीरउद्योगाचे देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्व लक्षात घेऊन लघु व कुटीर उद्योगाच्या विकासासाठी विविध प्रयत्न केले आहे. त्यामुळे आधुनिक काळात लघु व कुटीर उद्योग हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे एक महत्वाचे अंग बनले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत लघु व कुटीर उद्योगांना अत्यंत महत्वाचे स्थान आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी व दादाभाई नौरोजी यांनी भारतातील दारीद्रय दूर करण्यासाठी लघु व कुटीर उद्योगावर भर दिला. लघु व कुटीर उद्योग हे श्रमप्रधान उद्योग असल्यामुळे कमी भांडवल गुंतवणुकीतून अधिक रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे भारतासारख्या विकसनशिल देशात लघु व कुटीर उद्योगाचा विकास महत्वाचा वाटतो. तसेच लघु व कुटीर उद्योग हे माठया उद्योगांना पूरक ठरतात. भारतात शेती व्यवसायानंतर लघु व कुटीर उद्योगावर बहुसंख्य भारतीयाचे जीवनमान अवलंबून असल्याचे दिसून येते. मोठया उद्योगाच्या तुलनेत लघु व कुटीर उद्योगांना भांडवल, श्रम, जागा, व तंत्रज्ञान हे कमी लागते. भारत सरकार व राज्यसरकारने लघु व कुटीर उद्योगाचे महत्व लक्षात घेवून सहकार्य, सवलती व प्रोत्साहनाचे धोरण स्वीकारले आहे. देशाच्या आर्थिक विकासात लघु व कुटीर उद्योगाची भूमीका ही फार महत्वाची आहे. त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशात लघु व कुटीर उद्योग टिकून राहणे व विकसीत होणे फार गरजेचे आहे.

Date of Online: 30 Jan 2023