Issue Description


Authors : रवींद्र बापूराव शेंडे

Page Nos : 221-223

Description :
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भारतात प्रत्येक राज्यांनीएराज्यातील प्रत्येक जिल्ह्यांनीएजिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांनी व तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी ;काही मोजके अपवादद्धउत्साहात साजरा केला आणि अमृत कालावधीला (2022-2047) आरंभ झाला आहे. मिळवलेला विकास केव्हाही हातातून जाऊ शकतो आणि नवीन क्षमतांची ओळख कोविड.19 ने करून दिली आहे. विकास आणि आपत्ती यांचा जवळचा संबंध आहे, हा संबंध शास्त्रज्ञानाने सोडवून अमृत कालावधीत प्रत्येक भारतीयांना देशाला स्वयंपूर्णतेसह विकसितपणा मिळवायचा असल्यामुळे सत्तेच्या बाजूने नाही तर सत्याच्या बाजूने प्रत्येक नागरिकांनी काम करणे अपेक्षित आहे. भारतातील रचनात्मक बदलात तंत्रज्ञानावर भर देण्यात येत असला तरीएअध्यात्म आणि विज्ञान म्हणजेच सर्वोदयाचा वापर अमृत कालावधीत अत्यावश्यक आहेण् विज्ञान व तंत्रज्ञान यातून मानवी जीवन सुखकर होत आहे हे खरे असले तरी त्याचा दुरुपयोग होत आहे. यावर आळा अमृत कालावधीत घालणे अत्यावश्यक आहेण्समाजाला अवैज्ञानिक उपक्रमात गुंतवणे हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा दूरूउपयोग आहे तरएसमाजाला सुशिक्षित. सुसंस्कृत. सर्जनशील होण्यासाठी विविध साधने पुरविणे हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सदुपयोग आहे. अनेक विविधता; भाषिक, जातीय व सांस्कृतिकद्ध सांभाळत भारताला जुने वैभव मिळवता येईल. यासाठी अमृत कलावधी एक प्रयोगशाळा ठरणारी आहे. थोडक्यात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान मदतीने सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सर्जनशीलतेची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे.

Date of Online: 30 Jan 2023