Authors : प्रिया वि. सोनटक्के
Page Nos : 216-220
Description :
भारतातील लहान-लहान आकाराची खेडी आणि नगर व महानगरांमधील स्थानिक स्वशासनाची संरचना वेगवेगळी असणे स्वाभाविक आहे. भारतातच नव्हे तर जगातल्या अनेक देशांमध्ये स्थानिक स्वशासनाला प्रदीर्घ असा इतिहास लाभला आहे. भारतातील खेडयांमध्ये ग्रामपंचायतीचे अस्तित्व वैदिक काळापासून आहे. वेदांमध्ये ग्रामसभा रामायणात जनपदसंघ, महाभारतात ग्रामसभा व तेथील प्रमुखास ष्ग्रामणीष् म्हणत असल्याचा उल्लेख आढळतो.
भारत हे संघराज्य आहे. भारतीय संघराज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजित आहे. भौगोलिक आकार आणि एकूण लोकसंख्या याबाबत घटकराज्यांमध्ये विविधता आहे. भारतीय संघराज्यात मणिपूर, त्रिपुरा, गोवा, सिक्कीम यासारखी लहान आकाराची घटकराज्ये आहेत. तर दुसरीकडे उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान यासारखी मोठी घटकराज्ये देखील आहे. भारतात पंचायतराज योजनेची निर्मिती ही बलवंतराय मेहता समितीने केली. पंचायतराजचे गठण तीन स्तरावर असावे. खेडयासाठी ग्रामपंचयात, विकास गट किंवा तालुका पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद अशी तीन स्तरीय रचना निर्माण करण्याची शिफारस या समितीने केली.