Authors : मिलिंद बळीरामजी भगत व सावधान वासुदेव उमक
Page Nos : 205-208
Description :
आधुनिक काळात एखाद्या आंदोलनाच्या यशात प्रसार माध्यम व समाज माध्यमांची भूमिका महत्वाची ठरत आहे. माध्यमांचे महत्व ओळखून अण्णा हजारे यांनी जनलोकपाल आंदोलनाच्या प्रचार-प्रसाराकरीता अतिशय प्रभावीपणे वापर करुन आंदोलनास व्यापक स्वरुप दिले. टि.वी., वृत्तपत्रे, साप्ताहिक, मासिके या पारंपारिक प्रसार माध्यंमाबरोबरच फेसबुक, व्टिटर, युटयूब, इमेल, या नवीन समाज माध्यंमांवरुनही मोजक्या शब्दात पण जलदगतीने संदेश लोकांपर्यंत पोहचविण्यात आले. भ्रश्टाचाराविरुध्दची लढाई अण्णांनी जषी रस्त्यावर येऊन लढली तशीच समाज माध्यमांवरुनही लढली. त्यामुळेच जास्तीत जास्त लोकं आंदोलनात सहभागी झाले. संपुर्ण देशभरात आंदोलनाचा विस्तार झाला. एरवी आंदोलनापासून दूर राहनारा मध्यम वर्गही रस्त्यावर उतरला आणि भारतीय राजकारणाला नवी दिशा मिळाली. अण्णाच्या आंदोलनास मिळणारे जनसमर्थन पाहून भारत सरकारनी अण्णाच्या मागण्या मान्य करुन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. लोकपाल विधेयक तयार करण्यास सरकार तयार झाले. आंदोलनकाळात अण्णा आणि त्यांच्या सहका-यांनी प्रसार व समाज माध्यमांवरुन जो दबाव निर्माण करण्यात आला, त्याचाच तो परिपाक होता. देशाला माध्यमांच्या परिणामकारकतेची शक्ती कळली.