Issue Description


Authors : कीर्ती आ. वर्मा

Page Nos : 182-186

Description :
आजच्या युगात बदलत असलेली जीवनशैली अधिक प्रमाणात आजारांच्या प्रादुर्भाव अनेक प्रकारचे प्रदूषण मधून बाहेर पडण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मंत्र म्हणजेच सात्विक व संतुलित आहार होय अनेका अनेक रोग आजारा वर प्रभावी उपाय उपलब्ध नसंताना फक्त आणि फक्त आहार शक्तीच्या आधारे अनेक लोक व रोगी रुग्णांनी यावर मात केली आहे. अनेक लोकांना आहाराच्या माध्यमातून रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहारावर लक्ष देण्याची गरज आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचे सर्वात श्रेष्ठ माध्यम म्हणजेच आपल्या घरी बनविलेले ताजे अन्न वरण, भात, भाजी, पोळी, कळी, दही, सैलेड, कोशिबीर, पापड योग्य आहार होय. श्रेष्ठ आहार हा बळकट ठेवण्याचा पाया आहे. आपल्या सभोवताल जीवनसृष्टीतूनच मनुष्य सुखकार निरामय निरोगी जीवन जगत असतो. आपले आहार म्हणजे आपले बिनामूल्य औषधी आहे. आहारात दैनंदिन वापरण्यात येणारे औषध म्हणून मदत होते रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहाराचे उत्तम महत्त्व दिसून येते. चांगल्या आणि निरोगी जीवनासाठी सकस आणि आहार घेणे खूप गरजेचे आहे. अनेक लोक बाहेरचे जेवण किंवा फास्ट फूड किंवा तळलेले पदार्थ खाणे पसंत करतात. पण हे पदार्थ आपल्या शरीरासाठी नेहमीच हानिकारक असतात. आजकाल मुलांना नेहमी सात्वीक आहार खाण्याची गरज आहे. आजच्या भावी पिढ्या निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आपण चांगल्या खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन दिले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जंक फूडचे हानिकारक परिणाम आणि निरोगी अन्नाचे सकारात्मक परिणाम यावर भर दिला पाहिजे. लोकांनी लहानपणापासूनच मुलांना आहारा विषयीक माहिती दिली पाहिजेत. प्रस्तुत शोधनिबंधात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याच्या आहार विषयक अध्ययन भूमिका अभ्यासला आहे.

Date of Online: 30 Jan 2023