Issue Description


Authors : सरोज बाबुराव कांबळे, एस. एन. बुटे

Page Nos : 30-33

Description :
भारतीय शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्येबाबत असे म्हटल्या जाते की, भारतीय शेतकरी कर्जात जन्मतो कर्जात जगतो व कर्जातच मरतो या वाक्येवरून भारतीय शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती किती दयनिय आहे हे लक्षात येते. पुरातन काळापासून चालत आलेल्या स्पृश्य.अस्पृश्य सारख्या जाचक रूढीप्रथांमुळे अनुसूचित सामाजाची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व आर्थिक उन्नती झालेली नाही. परिणामत: या समाजामध्ये दारिद्रयाचे प्रमाण तुलनेने इतर समााजापेक्षा अधिक आहे. या सामाजिक कारणा सोबतच नैसर्गीक संकटे व पारंपारिक शेती करण्याच्या पध्दतीमुळेही शेती उत्पादनात घट होत जाउुन त्यांच्या समोर आर्थिक अडचणी निर्माण होतात. या आर्थिक प्रश्नांचे निराकरण करण्याकरिता कर्ज घेणे हा एकमेव पर्याय शेतकरी बांधवांसमोर उभा राहतो. या शेतकऱ्यांना बी.बीयाने, खते, किटकनाशके, गाय.बैल खरेदी, शेतीची सुधारित अवजारे, सिंचनाच्या सोयीए जमीन सुधारणा आणि कौटुंबीक बाबी इत्यादी गरजांच्या पुर्ततेकरिता कर्जाची आवश्यकता भासते. या गरजांच्या पुर्ततेकरिता शेतकरी सहकारी बँक, राष्ट्रीय बँक, सावकार, नातेवाईक, नाबार्ड आणि बचत गट सारख्या माध्यमाव्दारे कर्ज घेतात.

Date of Online: 30 Sep 2022