Issue Description


Authors : प्रा. स्वप्निल एस. बोबडे, डाॅ. समित माहोरे

Page Nos : 172-179

Description :
चंद्रपूर हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा जिल्हा असून जिल्ह्यातील 79 टक्के लोकसंख्या ही शेतीवरच उपजिविका करतात. जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. 11443 चै.कि.मी. क्षेत्रफळ असलेला हा जिल्हा आकारमानाने महाराष्ट्र राज्यात 14 व्या क्रमांकावर असून हे क्षेत्र राज्यात 3.5 टक्के आहे. चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्रकारची जमीन आढळून येते. वर्धा नदीच्या खोÚयातील काळ्या कसदार जमिनीत कापूस, गहू, डाळी, सोयाबिन आणि ज्वारी अशा प्रकारची पिके तर वैनगंगा खोÚयातील काळसर जमिनीत प्रामुख्याने भाताचे पीक घेण्यात येते. चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण पिकाखालील क्षेत्राच्या अभ्यासावरून असे दिसून येते की, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अभ्यास कालावधी दरम्यान कापूस या पिकाखालील क्षेत्राचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. आणि एकूण अन्नधान्य पिकाखालील क्षेत्रात घट होत आहे. एकूण तेलबियांच्या पिक क्षेत्रामध्ये सोयाबिन या पिकाचे क्षेत्र वाढलेले आहे. एकूण तृणधान्य, एकूण ज्वारी या पिकाखालील क्षेत्र कमी होत आहे. यावरून असे लक्षात येते की, चंद्रपूर जिल्ह्यातील पिक रचनेत मोठे बदल होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी परंपरागत पिकांकडून नगदी पिकाकडे वळल्याचे पीक रचनेवरून दिसून येते.

Date of Online: 30 May 2022