Issue Description


Authors : डाॅ.प्रवीण दि. मुधोळकर

Page Nos : 154-160

Description :
आधुनिक काळात मानवी समाजासहीत समस्त जीवसृष्‍टीसाठी अस्तित्वविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. मानव आणि इतर प्राणी यामध्ये मानवाला मिळालेल्या बुध्दी आणि विज्ञानाच्या वरदानामुळे तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला आहे. ज्या विज्ञानाने त्याच्या जीवनात संपन्नता आणली. तेच विज्ञान आता त्याच्यासाठी भस्मासूर बनू पाहात आहे. मानवाने आपल्या गरजा पर्यावरणपूरक पध्दतीने पुर्ण कराव्या त्यासाठी त्याने विज्ञानाचा विधायक वापर करावा, त्याने धार्मिक व नैतिक मुल्ये जोपासून समस्त सृष्‍टीसोबत स्वतःचे कल्याण साधण्यासाठी विश्‍वस्ताची संकल्पना स्वीकारावी,निसर्गाचा आदर करावा या विचारांवर भर देण्यात आला आहे. पर्यावरणीय समाजशास्त्राचा भाग म्हणून शाश्‍वत विकास आणि पर्यावरणपूरक उर्जास्त्रोत यांचा सहसंबंध स्पष्‍ट करतांना पर्यावरण व परिस्थितिकी तंत्र याबाबत विष्लेशण केल्या जाणार आहे. यातून निसर्गाच्या कार्यप्रणाली आणि त्यात मानवाची भूमिका कोणती याबाबत विष्लेशण करण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी समाजाच्या उर्जेच्या गरजा सामुहिक प्रयत्नातून पर्यावरणपूरक पध्दतीने कषा पुर्ण केल्या जाऊ षकतात. हे आनंदवनातील बायोगॅस प्रकल्पाबाबत माहितीच्या विष्लेशणाव्दारे स्पश्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकल्पाचा उपयोग ग्रामीण व शहरी समुदायाच्या प्रगतीसाठी करता येईल काय याबाबतही यामध्ये विचार केल्या गेला आहे. या संशाेधन विषयामुळे मानव समाजाची सद्यस्थिती आणि आपला व येणार्‍या पिढीचा भविष्‍यकाळ जास्त संपन्न बनविण्यासाठी करावयाचे प्रयत्न यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. आधुनिक मानवाची मुख्य गरज असलेल्या उर्जानिर्मितीसाठी पर्यावरणपूरक पध्दतीच्या उपयोगामुळे मानवजातीसमोरील अनेक समस्या कमी होण्यास कशाप्रकारे मदत होईल यावर या विषयानुशंगाने विचार करण्यात आला आहे.

Date of Online: 30 May 2022