Issue Description


Authors : मोक्षदा नाईक

Page Nos : 150-153

Description :
साहित्य आणि समाज यांचा नेहमीच परस्पर संबंध राहिलेला आहे. समाजाचे चित्रण साहित्यात उमटत असतेच आणि साहित्यातून ही समाजाला एक दिशा मिळत असते. मग ते साहित्य जर समाजाशी, समूहाचे जोडणारे असेल तर आपसूकच त्यातील विचारांचे, कृतीचे समाज समर्थन करत असतो. ग्रामीण साहित्य हे ग्रामीण समूहाशी, ग्रामीण समाजाशी जोडणारे साहित्य आहे. ग्रामीण जीवनाचे, ग्रामसंस्कृतीचे ग्रामपरंपरेचे, ग्रामीण चालीरीतींचे आणि त्यासोबतच ग्रामीण समस्यांचे दर्षन ग्रामीण साहित्यातून प्रभावीपणे व्यक्त होत आले आहे. साहित्याला सामाजिक बांधिलकीचे मुल्य असते. कारण साहित्य हे केवळ रंजनासाठी नसते, तर समाजात ज्या समस्या आहेत त्या समस्यापर्यंत पोहोचण्यासाठी साहित्याचा उपयोग होत असतो. आणि यालाच आपण सामाजिक बांधिलकी म्हणतो, आणि ही सामाजिक बांधिलकी बाळगूनच काही लेखक सातत्याने लेखन करत असतात. ग्रामीण साहित्याचा आणि ग्रामीण विकासाचा विचार करताना सामाजिक बांधिलकीचे हे तत्त्व अनेक लेखक पाळताना दिसतात. ग्रामीण परिसरातील शेतकर्‍यांच्या, दलितांच्या, अषिक्षितांच्या, बेरोजगारीच्या, ग्रामीण विकासाच्या समस्यांना, ग्रामीण साहित्य हे नेहमीच तोंड फोडत असल्याचे आपल्याला दिसून आलेले आहे. प्रत्यक्षपणे साहित्यातून त्या समस्या स्पष्‍ट झाल्या म्हणजे त्या सुटल्या असे नसते. परंतु व्यापकपणे शिक्षीत समाजासमोर, वाचकांसमोर त्या समस्या तो लेखक घेऊन जात असतो आणि त्याचा कुठेतरी फायदा हा ग्रामीण विकासासाठी होत असतो. ज्याप्रमाणे अनेक सामाजिक चळवळीतून साहित्य हे मोठे झालेले आपण पाहतो, त्याचप्रमाणे अनेक साहित्यिक चळवळीतून सामाजिक परिवर्तन झालेले ही आपणास दिसून आले आहे. ग्रामीण साहित्याची चळचळ ही ग्रामीण विकासासाठी कारणीभूत झाल्याचे आपल्याला अनेक लेखकांच्या लेखनातून आढळून आले आहे. अनेक ग्रामीण लेखकांनी ग्रामीण जाणीव निर्माण करणारे साहित्य लिहिले आणि मग ग्रामीण भागातील सामाजिक काम करणा-या लोकांनी या साहित्यातून गावाला विकासाच्या दिशेने पुढे नेले. ग्रामीण विकासाची चळवळ ही सामाजिक पातळीवर राबत होती त्यातून मग त्या साहित्याला बळ मिळत गेले. अशा रीतीने कुठेतरी ग्रामीण साहित्य आणि ग्रामीण विकास यांचा परस्पर संबंध असल्याचे आपणास दिसून येतो.

Date of Online: 30 May 2022