Authors : प्रा.डॉ.थाडेश्वर सं.मदनकर
Page Nos : 72-74
Description :
संगीत ही एक विश्वव्यापक सार्वभौमिक कला आहे. आरंभापासूनच मानवाने संगीत कलेद्वारा आपल्या व्यस्त जीवनशैलीतून संगीत गायनाद्वारे ख्याल गायनातून सौंदर्यात्मक रसानुभूतीच्या दर्शनाने आनंद लहरीतून संगीताचा सुखावह ठेवा घेतलेला आहे. पाश्चात्य तथा भारतीय तज्ञांच्या मतानुसार सौंदर्यशास्त्राच्या अनेक प्रकारांपैकी ज्यामध्ये समानता, विविधता, वैचित्रता, चमत्कारिता, सुव्यवस्था इत्यादीतून रसानुभूतीचे ख्यालगायनात सौंदर्यात्मक चमत्कारीक दर्शन घडून येते. भारतीय संगीताची मैफल ही आजही ख्यालानेच सजलेली असून तेच रुप सर्वांना भावणारे, हवेहवेसे वाटते. ख्यालगायनातील मांडणीतील बारकावे आपल्या लक्षात आल्यावर ख्यालगायनातील मांडणीतील काही सुरस व रुचिर घटकांचा विचार ख्यालगायक सौंदर्या त्मकदृष्ट्या करित असतो. ख्यालातील बंदिशांची समांतर थेट तार षडजावरच गाठावी लागते व यासाठी गायकाची रियाजी वृक्ती तसेच गायकाचा आवाज भारदस्त व कमावलेला असला पाहिजे व तेव्हाच ख्यालगायन करतांनी गायक ख्यालात रागाची सुयोग्य मांडणी करून सौंदर्यतत्वाचा विचार करीत असतो.