Authors : प्रा.त तुकाराम त्र्यंबकराव कोल्हे
Page Nos : 64-68
Description :
10 डिसेंबर हा मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो परंतु राज्य व्यवस्थेत तसेच समाज व्यवस्थेत काम करणाऱ्या अनेक लोकांना या दिवसाची माहिती सुद्धा असलेली दिसून येत नाही मानवी हक्क ही एक विश्वव्यापी संकल्पना आहे. मानवी हक्क किंवा मानवाधिकाराचे मुळ 17 व्या शतकात ईग्लंड व अमेरिकेत रुजलेले दिसून येते अमेरिका हा देश हा मानवाधिकाराच्या बाबतीत संरक्षणाच्या रुपात मानला जात होता. सामाजिक विकासात आरोग्य आणि शिक्षण या दोन घटकांचा मोठा सहभाग असतो. पर्यावरण प्रदुषणातून होणारी मानवी हक्कांची पायमल्ली थांबविली पाहिजे . खऱ्या अर्था ने सामाजिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करावयाचे असल्यास मुलभूत मानवी हक्काचे संरक्षण व संवर्ध न करणे अत्यन्त आवश्यक बाब दिसून येत आहे. जगातील सर्वच देशांनी मानवी हक्कांच्या बाबतीत जागरुक आणि गंभीर असणे गरजेचे आहे, म्हणून मानवी विकासासाठी मानवी हक्कांचे संरक्षण व संवर्धन करणे काळाची गरज आहे आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचे कायदे, नियम, उपाय, सूचना यांचे उल्लंघन न करणे, मानवाधिकार संघटन समुदायाला नियमांचे उल्लंघन न करता प्रोत्साहन देण्याचे कार्य करतात. तसेच अशा प्रकारच्या व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी संघर्षाच्या मार्गाचा अवलंब करताना दिसतात