Authors : देशमुख अ.
Page Nos : 161-163
Description :
संत तुकाराम महाराज अभंग निर्मितीसाठी सुप्रसिद्ध आहेत. या शिवाय त्यांनी एका नवीन विषयाला हात घातला व त्यावर
नानाविध प्रकारची रचना केली ही रचना अतिशय महत्त्वपूर्ण असून ती लोकासाहित्यपर आहे व लोकपरंपरेची आठवण करुन
देणारी आहे. तुकाराम महाराजांनी लोकपरंपरेचे जे रक्षक आहेत, मग तो वाघ्या-मुरळी असोत, गोंधळी, सरवदा सादर करणारे
तंतुकार असोत, वैराग्याची पदे गाणारे बाळसंतोष असोत, जगदंबेचे बेभान होऊन नृत्य करत स्तुती करणारे गोंधळी असोत किंवा
गावोगावी सकाळच्या वेळी सडासंमार्जन झालेल्या घरोघरच्या अंगणात नृत्य करणारे वासुदेव असोत. या सर्वांनी पिढ्यान्पिढ्या आणि
शतकानुशतके ह्या लोकपंरपरा जपल्या आणि एकमेकांच्या भूमिकेवर कोणतेही आक्रमण न करता आपली लोकगितांची परंपरा मात्र
मोठ्या निष्ठेने जोपासली ती तुकाराम महाराजांना भावली आणि तुकारामांनी वासुदेव, गोंधळी, वाघ्या-मुरळी, सरवदा यावर अतिशय
कर्णमधुर गेय पदे रचली व त्यामधून पांडुरंगाच्या भक्तीचा जयघोष सर्व महाराष्ट्रभर केला.