Authors : बिसुरे आर. म.
Page Nos : 157-160
Description :
यांत्रीकीकरणामुळे महानगरांचा विस्तार झाला. रोजगाराची संधी हमखास उपलब्ध होत असल्यामुळे खेड्यातील
माणसांचे शहरात स्थलांतर झाले. प्रमाणापेक्षा जास्त गर्दी वाढल्यामुळे त्याचा नागरी सुविधांवर विपरित परिणाम झाला.
निवासाच्या गैरसोयीमुळे झोपडपट्टयांची बेफाम वाढ झाली. अशा सर्व घटनांचे पडसाद मराठी महानगरीय कादंबरीत
उमटलेले दिसतात. महानगरीय जीवनाचे काही महत्वाचे घटक सांगायचे झाले तर औद्याेिगकरण आणि यांत्रीकीकरण,
असुरक्षितता आणि अनिश्चितता, व्यावसायिकता, आधुिनकता, पाटे संस्कृतीचे सह-अस्तित्व आणि सरमिसळ, गर्दी आणि
वेग, व्यक्तिवादी दृष्टिकोन, गर्दीत हरवलेला चेहरा, जगण्यातले ताणतणाव, अमानवी दुभंगलेपण, पाश्चात्य प्रभाव,
परात्मता आणि व्यामिश्रता, आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण, मुक्त बाजारपेठ, वाढता उपभोक्तावाद, जगण्यातील
बकालपणा, दहशतवाद, हिंसाचार आणि माहिती तंत्रज्ञानाचे महामायाजाल इत्यादी प्रभावी घटकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष
परिणाम महानगरीय जीवनशैलीवर होऊ लागला आहे. साठोत्तर काळात मराठी साहित्याच्या एकूणच रुपरंगात अंतर्बाह्य
स्वरुपाचे मुलभूत बदल होऊ लागले. या प्रक्रियेचाच एक भाग म्हणजे महानगरीय जाणिवांच्या विस्तारलेल्या कक्षा मराठी
साहित्यात प्रकट होऊ लागल्या.